Home Cities मुक्ताईनगर राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहंमद हुसेन यांचे निधन

राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहंमद हुसेन यांचे निधन

0
78

मुक्ताईनगर प्रतिनिधी | राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मोहंमद हुसेन उर्फ आमीर साहेब यांचे आज दुपारी आकस्मीक निधन झाले.

मोहंमद हुसेन उर्फ आमीर साहेब (वय६९) हे गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथरा खडसे यांचे अतिशय जवळचे समर्थक म्हणून गणले जात होते. त्यांनी काही काळ राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.


Protected Content

Play sound