२० जून ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करा : राऊतांचे थेट युनोला पत्र !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांना डिवचत खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच ‘युनो’ला पत्र लिहून २० जून रोजी ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करण्याची मागणी केली आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी आज संयुक्त राष्ट्रसंघ अर्थात युनोला पत्र लिहले आहे. या पत्रात नमूद केले आहे की-

मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नेता आहे. मी भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह, राज्यसभेचा सदस्य आहे. मुंबईतील मराठी तरूणांच्या हक्कांसाठी हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी १९६० मध्ये सुरू केला होता.

आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळासा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मागच्या वर्षी २० जूनला आमच्या पक्षातील आमदारांच्या गटाने बंड केलं. ५० खोके दिल्याने आमदारांनी भाजपसोबत हात मिळवणी केली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपने त्यांची सगळी शक्ती पणाला लावली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० तर अपक्ष १० आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला. मागच्या वर्षी २० जूनला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी सूरत गाढली. १२ नोव्हेंबर आणि १९ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यांच्या आजारपणाचा या गद्दारांनी फायदा घेतला.

२१ जून हा दिवस जसा जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच २० जूनला जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात यावा. जेणे करून या आमदारांची गद्दारी जग लक्षात ठेवेन.

खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहलेले पत्र आपल्या ट्विटर हँडलवरून जाहीर केले आहे. आता यावर शिंदे गटातर्फे उत्तर येण्याची शक्यता आहे.

Protected Content

%d bloggers like this: