शिंदाड येथील वि. का. सोसायटीची निवडणूक बिनविरोध

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिंदाड येथील विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीची सन – २०२३ – २०२७ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.

 

बिनविरोध निवडून आलेल्या विकासो संचालकाचा सत्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी व उपजिल्हाप्रमुख उध्दव मराठे यांच्या हस्ते दि.११ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता. विकास सहकारी सोसायटी शिंदाड कार्यालय येथे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पेढा भरवून अभिनंदन केले आहे. सामाजिक, राजकीय मतभेद दूर व्हावेत, विकास व्हावा, एकोपा, शांतता नांदावी याकरिता गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक एकत्र येऊन गावातील होतकरु व गाव विकासाची सामाजिक बांधिलकी जोपासणारे उमेदवारांची निवड करण्यात आली.

 

गावात तालुक्यात एक नवीन आदर्श निर्माण केला. सत्कार समारंभासाठी उद्घव मराठे, मा. उपजिल्हाप्रमुख अॅड.अभय पाटील, सचिव प्रशांत जैन, आनंदा चौधरी, हरी अमृत चौधरी, अशोक लोधी, अरुण तांबे, भास्कर पाटील, विजय पाटील, सुरेश पाटील, शांताराम पाटील, धोंडू पाटील आदि उपस्थित होते. बिनवरोध संचालकांमध्ये सर्व साधारण जागेसाठी हिलाल रामदास पाटील, समाधान सिताराम पाटील, नरेंद्र विक्रम पाटील, प्रेमसिंग भुरा परदेशी, अर्जुन नारायण पाटील, भाऊसाहेब नारायण पाटील, रमेश काशीराम पाटील, दिलीप भाऊराव तांबे, महिला राखीव – महिला राखीव – लताबाई धोंडु चौधरी, सुरेखा श्रीकांत पाटील, इतर मागास वर्ग – संजय बळीराम पाटील, वि.भ.ज. – कृष्णा अर्जुन धनगर, अनु. जाती – जमाती – दत्तात्रय रामदास पाटील हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Protected Content