वडजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी समाधान पाटील

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वडजी (ता.भडगाव) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी समाधान पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

 

परीवर्तन पॅनलचे आपसात ठरल्याप्रमाणे  वडजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा इंदिराबाई पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागेवर नुकतीच निवड घेण्यात आली. त्यात उपसरपंच  पदासाठी समाधान पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

यावेळी सरपंच मनिषा गायकवाड, माजी सरपंच सुभाष पाटील, परीवर्तन पॅनलचे मार्गदर्शक कैलास पाटील, राजेंद्र सोनवणे, दुध डेअरीचे चेअरमन रणधीर पाटील, बापुराव कुळकर्णी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेशी, स्वदेश पाटील, महेमुद पटेल, कीशोर मोरे, संभाजी मोरे, इंदिराबाई पाटील, पूनम सोनवणे, उज्ज्वला पाटील , नारायण पाटील, रघुनाथ अहिरे, सोसायटीचे माजी चेअरमन बाबाजी पाटील, डाॅ.दिपक परदेशी, सुधाकर पाटील, समाधान मोरे, माधवराव पाटील, पपेश पाटील, महारू पाटील,  पिंटु गायकवाड, रूपेश पाटील, पिचर्डे चे अनिल महाजन आदि उपस्थीत होते.

 

यावेळी निवड झाल्यानंतर समाधान पाटील यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच मनिषा गायकवाड यांनी तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी ए.एम.राठोड यांनी काम पाहीले.

Protected Content