अमळनेर पोलिसाच्या सतर्कतेने महिलेच्या चेहर्‍यावर फुलले हसू !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एसटीतून प्रवास करतांना महिलेची तब्बल पावणेतीन लाख रूपयांची रोकड असलेली पिशवी हरवल्याने ती धास्तावली, मात्र पोलिसांच्या सतर्कतेने तिला लागलीच बॅग परत मिळाल्याने तिचा जीव भांड्यात पडला.

सोमवारी दुपारी, बस मधून उतरत असतांना एक महीला प्रवाशी हीची पैशाची बॅग तिच्याकडे नसल्याचे तीच्या लक्षात आले. या बॅगमध्ये तब्बल २ लाख ७५ हजार रूपये असल्याने तिला मोठा धक्का बसला. यामुळे तीने लागलीच बस स्टँड ड्युटीवरील Aएएसआय नींबा शिंदे यांना बॅगचे वर्णन ओरडून सांगीतले. शिंदे यांनी लागलीच, त्या बसमधून उतरून चालू लागलेल्या प्रवाशांकडे त्वरेने पळापळ करून शोध घेतला. तेव्हा एका प्रवाशाकडे ती मिळून आली. त्यातील रोकड जशीच्या तशी होते.

या प्रकरणी चौकशी केली असता, सदर प्रवाशाने त्याच्या बॅगसारखीच असल्याने ती अनवधानाने स्वतःची समजून त्याच्या ईतर बॅगसोबत घाईगडबडीत उचलून सोबत घेतली होती. अर्थात, निंबा शिंदे यांच्या सतर्कतेने कष्टाचे पैसे परत मिळाल्याने सदर महिला अत्यंत आनंदीत झाल्याने तिच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. तर, निंबा शिंदे यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी यापूर्वीही ड्युटीस कायम हजर राहून प्रवाशांना सतत अशीच मदत केली आहे.

Protected Content