तिघेहि उमेदवार निवडून येतील – फडणवीस

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपचे तीनही उमेदवारांचे सहकार, कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील कामकाज उत्तम आहे. त्यामुळे हे तीनही उमेदवार घोडेबाजार न करताहि निवडून येतील, असा विश्वास विधानसभा विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक शिवसेनेचे दोन आणि भाजपने तीन उमेदवार दिले आहेत. भाजपने छत्रपती संभाजीराजेंची ढाल पुढे करीत तिसरा उमेदवार दिल्यावरून खा. संजय राऊत यांनी भाजपला निवणुकीत घोडेबाजार करायचा आहे. असा आरोप केला. भाजपचे यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माधम्यांशी संवाद साधत भाष्य केले.

भाजपतर्फे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज आम्ही विचारपूर्वकच भरला असून आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला तर घोडेबाजार होणार नाही. आणि जरी त्यांनी उमेदवार कायम ठेवला तरी सदसदविवेक बुध्दीने काही लोक आम्हाला मतदान करणारे आहेत. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील आणि तिसरा उमेदवार निवडून आणू, असा विश्वास असल्याचेही ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Protected Content