महाआघाडीचे जागावाटप ठरले; बसपा 38 तर सपा 37 जागांवर लढणार

लखनौ (वृतसेवा) समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सपा आणि बसपामधील जागावाटप जाहीर झाले असून बसपा 38 तर सपा 37 जागांवर लढणार असून, उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सपा,बसपाने उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करण्याचा निर्णय होता. परंतु महाआघाडीची घोषणा होऊन महिना उलटला तरी दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची घोषणा झाली नव्हती. परंतु अखेर सपा आणि बसपामध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या सूत्रानुसार दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशमधील 80 जागांपैकी काही जागा मित्रपक्षांना सोडून उर्वरित जागांचे आपसात वाटप केले आहे. त्यानुसार सपा 37 तर बसपा 38 जागांवर लढेल. सपा-बसपा महाआघाडीने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत.

Add Comment

Protected Content