काय सांगता ? : होय, आता नोटांचीही होणार फिटनेस चाचणी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्याला फिटनेस टेस्ट माहिती असेलच, अर्थात, माणसांची या प्रकारची चाचणी होत असते. आता मात्र लवकरच फाटक्या नोटांचीही या प्रकारची चाचणी होणार असल्याचे आरबीआयतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

फाटक्या नोटांचा वापर हा वादाचा मुद्दा आहे. विशेष करून या नोटांच्या देवाण-घेवाणीवरून बर्‍याचदा वाद होत असतात. या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता फाटक्या नोटांची फिटनेस टेस्ट होणार आहे. विविध प्रकारच्या ११ निषकांनुसार ही चाचणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या चाचणीतून पार पडलेल्या नोटा या वापरण्यासाठी योग्य असल्याचे ठरविण्यात येणार आहे.

अनेक बँकांमध्ये फाटक्या नोटा स्वीकारल्या जातात. तथापि, या नोटा ग्राहकांना वापरण्यासाठी दिल्या तर ते घेत नाहीत. यामुळे आरबीआयने जाहीर केलेली फिटनेस टेस्ट ही अतिशय उपायकारक ठरण्याची शक्यता आहे. या चाचणीची नेमकी प्रणाली कशी असेल हे आरबीआयने आजच जाहीर केलेले नाही. तथापि, याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

Protected Content