वर्ल्ड पॉवरलिफ्टींग इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रफुल्ल मेढेला सुवर्णपदक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अतुर्ली येथील पोलीस पाटील यांचा मुलगा प्रफुल्ल मेढे याने पश्चिम बंगाल येथे झालेल्या  नॅशनल पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जूनियर स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील पोलीस पाटील किशोर श्रीपत मेढे यांचे चिरंजीव  प्रफुल्ल मेढे याने २२ ते २७ मे २०२२ हावडा पश्चिम बंगाल या कालावधीत चालू असलेल्या नॅशनल पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जूनियर ६२ ते ६९ किलो वजन गटात १०२.५ किलो वजन उचलून बेंचप्रेस स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.महाराष्ट्र संघात प्रफुल्ल मेढे यांचे निवड करण्यात आली होती. प्रफुल्लला बास एस गोस्वामी सर( मुंबई ) व त्याचे बीएसएफ जवान काका रामू श्रीपत मेढे  यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content