Home क्राईम देविदास कॉलनीतील मंदिरात धाडसी चोरी ; दोन पितळी कलश लंपास

देविदास कॉलनीतील मंदिरात धाडसी चोरी ; दोन पितळी कलश लंपास

0
11

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील देविदास कॉलनी परिसरातील कृपाळू शिव साई देवस्थान येथील महादेव-साईबाबा मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरावर डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी दोन पितळी कलश चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेपासून १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिरातील दोन पितळी कलश लंपास केले. मंदिर परिसरात कलश नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरीला गेलेल्या दोन्ही पितळी कलशांचे एकूण वजन अंदाजे ६० किलो असून, त्यांची किंमत सुमारे ३६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी विवेक अनिल जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील संभाव्य सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य बाबींच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound