युपी सरकारचा जळगाव एनएसयुआयतर्फे निषेध

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना आझमगड येथे पोलिसांनी अडविल्याच्या कृत्याचा जळगाव एनएसयुआयतर्फे निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

जळगाव जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आपल्या सहकार्‍यांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार नितीन राऊत हे उत्तर प्रदेशातील आजमगड मधील बास गावच्या दिवंगत दलित समाजाच्या सरपंच सत्यमेव जयते यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची हत्या झाली असून जयते कुटुंबीयांच्या सांत्नवपर भेटीसाठी जात असताना नामदार नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने राज्याच्या सीमेवरती अडविले. पोलिसांनी या दलित समाजाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मज्जाव केला.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नामदार नितीन राऊत हे स्वतः एक दलित समाजाचे नेते आहेत आपल्या सहकार्याची निर्घुण हत्या करण्यात आली व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी वयात दुःखातून सावरण्याची साठी धीर देण्यासाठी ते उत्तर प्रदेश मध्ये येताच त्यांना पोलिसांनी अडविले व एका ठिकाणी स्थानबद्ध केले. असून हे कृत्य अतिशय निंदनीय असे आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, भाजप पक्षाने नेहमीच वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून व उत्तर प्रदेश मध्ये देखील बहुसंख्य अशा दलित समाजाचा केवळ आणि केवळ मतांसाठी वापर केलेला आहे. परंतु दलित समाजावर ती वेळोवेळी जेव्हा अत्याचार झाले तेव्हा मात्र भाजप पक्षाने दलित समाजाला बाजूला टाकत कुठल्याही प्रकारचा आधार या समाजाला दिला नाही. युपीतील घटने मधून देखील संपूर्ण भारताने बघितले की दलित समाजाच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी जात असलेले नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने हेतुपुरस्कर कडून येथे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे भाजप पक्षाला दलित समाजाबद्दल किती द्वेष आहे हे आज संपूर्ण भारताने बघितले व त्यामुळेच या सर्व प्रकाराचा जळगाव जिल्हा एनएसयुआय च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण, शहर सचिव जगदीश गाडे, भरत ललवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content