महात्मा गांधी उद्यानात जळगावकर झाले भजन संध्येशी एकरूप

जळगाव (प्रतिनिधी) ठुमक चलत रामचंद्र, भजो रे मन राम गोविंद हरे, जग मे सुंदर है दो नाम या भक्ती गीतांसह महात्मा गांधीजींच्या संगीताविषयी असलेल्या विचाऱ्यांची अनुभूती जळगावकर रसिकांना झाली. महात्मा गांधी उद्यानामध्ये आयोजीत भजन संध्येत रसिक स्वरांशी एकरूप झाले होते.

 

गांधी रिसर्च फाऊंडेशन व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐतिहासिक दांडी यात्रा या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आज महात्मा गांधी उद्यान येथे भजन संध्येचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे ज्येष्ठ विश्वस्त दलीचंद ओसवाल, जैन फार्मफ्रेश फुडचे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, आनंद गुप्ते उपस्थित होते.

 

भजन संध्या ह्या विशेष कार्यक्रमाची सुरवात ‘ठुमक चलत रामचंद्र’ ने झाली. यानंतर भजो रे मन राम गोविंद हरे, जग मे सुंदर है, प्राण्यांची ही साद ऐकशील केव्हा राम दर्शन देशील केव्हा, कमल नयन वाले राम आदी भजन सादर केले. राम का गून गान करे या भजनाने समारोप झाला. बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील संगीत विभागाचे प्रमुख पंडीत संजय पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळ राऊत अकोला, पवन श्रीराम, श्रृती जोशी, अक्षय गजभिये, भाग्यश्री भंगाळे यांनी सादरीकरण केले, सलमान शहा व नितीन पाटील यांनी साथसंगत केली. भुजंगराव बोबळे यांनी सुत्रसंचालन केले. यानंतर कलावंतांचा सुतीहार देऊन दलिचंदजी जैन यांनी सत्कार केला.

Add Comment

Protected Content