एमपीएससी परिक्षेत वरखेडी येथील माधुरी चौधरीचे यश

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वरखेडी माधुरी चौधरी हिने नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत राज्यातुन १० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.

येथील अशोक पुंडलिक चौधरी यांची कन्या आहे. माधुरी हिचे बालपणीचे शिक्षण हे वरखेडी गावात झाले असुन तिने उच्च शिक्षण हे जळगांव येथील एस. एस. मणियार लाॅ विद्यालयात घेऊन एल. एल. एस. पदवी प्राप्त केली. तद्नंतर माधुरी चौधरी हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेत सहभाग घेवुन राज्यातुन १० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला. तिला वरखेडी येथील योगेश जाधव, गणेश शिरसाठ सह मित्र परिवाराचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माधुरी चौधरी हिचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!