भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्याबाबत निवेदन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना शुक्रवार २५ मार्च रोजी निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती जळगावच्या वतीने १४ एप्रिल रोजी सुभाष चौकपासून, महात्मा गांधी मार्केट, टॉवर चौक, नेहरू पुतळा आणि रेल्वे स्टेशनजवळील पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.  या मिरवणुकीत कोरोनाच्या सर्व नियम व अटी व शर्तीचे पालन करण्यात येणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचे सुद्धा पालन करण्यात येणार आहे. या मिरवणूकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्ष यावर आधारित विविध प्रसंगाचे सजवलेले चित्ररथ डेकोरेशन सह वाहने राहणार आहेत. त्यापध्दतीने या मिरवणूक पारंपारिक वाद्य वाजवून आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाने आयोजित भव्य मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देवून केली आह. याप्रसंगी मुकुंद सपकाळे, नगरसेवक सुरेश सोनवणे, चेतन नन्नवरे, कपिल जाधव, अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.

Protected Content