शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याने कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष ! (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून एकाच जल्लोष केला.

काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे नेते तसेच सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षाच्या निवृत्तीच्या निर्णय घेतला होता. शरद पवार यांच्या निर्णयावर राज्यातील समर्थक असलेले नेते आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा देण्याची भूमीका मांडली होती. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर पत्रकार परिषदेत जाहीर केला. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. शरद पवार यांनी राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून एकाच जल्लोष केला. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर , शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content