अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घेतल्यामुळे आमदार अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्यांनी पवार साहेबांच्या निर्णयाचे स्वागत केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रतोद आमदार अनिल पाटील यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात आधीच स्पष्ट भूमिका घेतली होती. पवार साहेबांनी निर्णय मागे न घेतल्यास आपण पदाचा राजीनामा देऊ असा निर्धार त्यांनी केला होता. या पार्श्वभूमिवर, शुक्रवारी सायंकाळी शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आमदारांनी समर्थकांसह याचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत पवार यांचे समर्थन करण्यात आले.
यावेळी बोलतांना आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, ”आमच्यासह राज्यभरातील सर्वच कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय खूप वेदनादायी होता. त्यांनी जर हा निर्णय कायम ठेवला असता तर आम्हीही राजकारणातून निवृत्ती घेतली असती. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत निर्णय मागे घेतल्याने सर्वत्र आनंददायी वातावरण आहे. या निर्णयाने सर्वत्र चैतन्य पसरले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.”
या आनंदोत्सवाच्या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एल.टी.पाटील, कृ.ऊ.बा. समिती संचालक समाधान धनगर, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नगरसेवक विवेक पाटील, शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, प्रा.अशोक पवार, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, सरपंच दिनेश पाटील, संजय पाटील, कैलास पाटील, विजय पाटील, इम्रान खाटीक, पप्पू कलोसे, दर्शन पाटील, भूषण भदाणे, उदय पाटील, भटू पाटील मंगरूळ, संजय कापरे, निलेश देशमुख, राहुल गोत्राळ, बाळू पाटील सुनील शिंपी, सचिन वाघ, राहुल पवार,राहुल पाटील, आबीद मिस्तरी, आरिफ पठाण, अनिरुद्ध शिसोदे आदींसह सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.