ठाकरे गटाचे नाव व मशाल चिन्ह देखील धोक्यात !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालात ठाकरे गटाचे नाव आणि मशाल हे चिन्हदेखील पोटनिवडणुकीनंतर धोक्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

काल सायंकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालातून उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हे एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव तसेच मशाल हे चिन्ह देखील धोक्यात येणार असल्याचे वृत्त टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने दिले आहे.

या वृत्तानुसार निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर ठाकरे गटाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव तसेच मशाल हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. यामुळे ठाकरे गटाला लागोपाठ दुसरा मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content