हर कुत्ते का दिन आता है ! : संजय राऊत यांची घणाघाती टीका

कणकवली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयावर आज खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे.

काल निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाची मालकी एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील असा निर्णय दिल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार टिकास्त्र सोडले असून आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दरम्यान, आज खासदार संजय राऊत हे कणकवली दौर्‍यावर असून येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, सकाळी वृत्तपत्रात जल्लोष करत असल्याचं पाहिलं. फोटोत मोजून सात चेहरे होते आणि त्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते काल शिंदे गटाबरोबर फटाके फोडत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन शिवसेना वाढणार आहे का? असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

खासदार राऊत पुढे म्हणाले की, हिंदीत एक म्हण आहे की-हर कुत्ते का दिन आता है. . .कोकणात जशी माकडे घुसतात तसे हत्तीदेखील ! अशी टिका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, समाज माध्यमांवर लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात एका म्हणीचा उल्लेख आहे की, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही, तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Protected Content