कोर्ट मराठा समाजला न्याय देईल; जरांगेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्रींची प्रतिक्रिया

मुंबई-वृत्तसेवा | मनोज जरांगे यांनी बीड येथील इशारा सभेत २० जानेवारीला मुंबईत आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. यावेळी जरांगे यांनी राज्य सरकारला देखील गंभीर इशारा दीला आहे. शहाणपणाची भूमिका घ्या, आमच्यावर डाव टाकू नका, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्ट २४ जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार आहे. कोर्टाने महाराष्ट्रातील जनभावनेचा आदर राखला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने हा फार मोठा निर्णय आहे. त्यामुळे मी कोर्टाचे आभार मानतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

२४ तारखेला आमची तज्ज्ञ वकिलांची फौज कोर्टा भूमिका मांडेल. मला वाटते यातून मराठा समाजाला न्याय मिळेल. महाविकास आघाडी सरकारने पुरावे मांडले नव्हते. त्यामुळे अपयश आलं, असे शिंदे म्हणाले.

सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरु होईल. त्यामुळे सर्वांनी संयम राखला पाहिजे. सगळ्यांचे मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे. सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आरक्षण कसं मिळेल, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

Protected Content