‘लिव्ह इन’ वरून दोन्ही कुटुंब एकमेकांना भिडले : १३ जणांवर गुन्हे दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील एक तरूण व तरूणी लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत असतांना त्यांच्या दोन्ही कुटुंबियांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने परस्पर विरोधी १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, भुसावळ येथल मूळ रहिवाशी आणि सध्या उल्हासनगर मुंबई येथे वास्तव्यास असणार्‍या महिलेची मुलगी ही यावल येथील चंदू पंडित वानखेडे यांच्या घरात त्यांच्या मुलासोबत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून विवाह न करता राहत आहे. या अनुषंगाने ही महिला आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी दिनांक २३ रोजी यावल येथे आपल्या आप्तांसह आल्या होत्या. याप्रसंगी संबंधीतांनी त्यांना मुलीची भेट घेऊ दिली नाही. तसेच याप्रसंगी दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झालेत. वानखेडे कुटुंबातील लोकांनी ती महिला आणि तिच्या आप्तांना मारहाण केली. या प्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदू पंडित वानखेडे आणि इतरांच्या विरोधात यावल पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, यावल पोलीस स्थानकात चंदु पंडीत वानखेडे (वय ४९, रा. यावल) यांनी दुसरी फिर्याद दिली असून यत म्हटले आहे की , सुनिल सिताराम भोई, (ह.मु.उल्हासनगर, मुंबई ) यांच्यासह सहा जणांनी मिळुन गैरकायद्याची मंडळी जमवुन घरात घुसुन मला व माझ्या कुटुंबास शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यानुसार त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थात दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधी फिर्याद दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान या प्रकरणी अजून तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत यावल शहरात सार्वजनिक ठिकाणी चंदुलाल वानखेडे, विशाल वानखेडे, मोहन भोई, लोकेश भोई, रोहीत भोई, दिलीप भोई, विनोद मोरे आणि गिरीश भोई यांच्यासह पाच महीला या सर्वांनी आरडा ओरड करीत एका मोकांना शिविगाळ करीत मारहाण केली म्हणुन या सर्वांच्या विरूध्द तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेकॉ राजेन्द्र पवार करीत आहे .पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी वसीम तडवी करीत आहेत.

Protected Content