जिल्ह्यात १४ नवीन कोरोना बाधीत; रूग्ण संख्या ५२२ वर

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात १४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ५२२ वर पोहचल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार-जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, अमळनेर, यावल, एरंडोल, चाळीसगाव, नशिराबाद, पाचोरा, जामनेर, भडगाव या ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 84 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चौदा रूग्णाचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगाव 7, जळगाव येथील ओमकार नगर, शिरसोली येथील तीन तर यावल, भुसावळ, जामनेर, एरंडोल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 522 इतकी झाली आहे.

आजच्या रिपोर्टमध्ये भडगावात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे येथील आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याचेही आजच्या रिपोर्टमधून अधोरेखीत झाले आहे.

Protected Content