आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने शिरसाळे येथील हनुमान मंदीर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शिरसाळे येथील जय श्री हनुमान मंदीर देवस्थानाला ग्रामविकास विभागाकडून ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास खात्यामार्फ मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे.

बोदवड तालुक्यातील शिरसाळे येथील हनुमान देवस्थानाचा ‘ब’ वर्ग दर्जाचे तिर्थक्षेत्र पर्यटनमध्ये समावेश करण्यासाठी मंदीराचे विश्वस्त यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास खात्याच्या मार्फत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून श्रीक्षेत्र शिरसाळा हनुमान मंदिराचा “ब” वर्ग दर्जा करण्यात यावी, अशी मागणी केली होती. नुकतेच ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत बोदवड तालुक्यातील शिरसाळे गावातील प्रसिध्द जय श्री हनुमान मंदीर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यास मंजूरी दिली आहे. दरम्यान, मंदीर देवस्थानाला आता ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Protected Content