परिवर्तनतर्फे ‘भाऊंना भावांजली’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी | जैन उद्योग समूहाचे संस्थापक दिवंगत पद्मश्री भंवरलालभाऊ जैन यांच्या जयंतीनिमित्त परिवर्तन संस्थेने १२ ते १९ डिसेंबरच्या दरम्यान भाऊंना भावांजली या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

भाऊंना भावांजली परिवर्तन महोत्सव १२ ते १९ डिसेंबर दरम्यान भाऊंचे उद्यानात आयोजित केला आहे. या आठ दिवसांत जळगावकरांना साहित्य, नृत्य, नाट्य, संगीताची सांस्कृतिक पर्वणी मिळणार आहे. भावांजली महोत्सवाचे हे पाचवे वर्षे आहे. शहराच्या साहित्य, कला, संगीत क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले. त्यांचे स्मरण करण्यासाठीच भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन करत आहे. महोत्सवाचा प्रारंभ १२ डिसेंबर रोजी भाऊंच्या उद्यानातील आर्ट गॅलरीतील चित्र प्रदर्शनाने होणार आहे.
१३ डिसेंबर रोजी रोटरी भवन मायादेवी नगरात चर्चासत्र होईल. चर्चासत्र रोटरी भवन, मायादेवीनगर येथे होईल. १४ ते १९ डिसेंबरपर्यंत कार्यक्रमांचे सादरीकरण भाऊंच्या उद्यानातील ऍम्फी थिएटरमध्ये करण्यात आले आहे. नाटक, गाणी, साहित्य, नृत्य, संगीत, चित्र अशा विविध कलांचा मेळा दररोज सायंकाळी ६.३० वाजता रंगणार आहे.

भाऊंना भावांजली हा महोत्सव अनिल कांकरिया, छबीलदास राणे, अनिश शहा, डॉ. रणजित चव्हाण, नंदलाल गादिया, किरण बच्छाव, नारायण बाविस्कर या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव साजरा होणार आहे.

Protected Content