कंपनीच्या खोली मजूराने केलं असं काही… पोलीसांची घटनास्थळी धाव

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमधील एका कंपनीच्या परिसरातील खोलीत एका मजूराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद अशोक निमसे (वय-३५) रा. सनावद ता. बडवा जि. खरगोन (मध्यप्रदेश) असे मयत तरूणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, विनोद निमसे हा एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमधील काजा मिल कंपनीत कामाला होता. कंपनीच्या मालकीच्या खोलीत वास्तव्याला होता. त्याचा भाऊ आकश निमसे हा जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे राहत होता. नेहमीप्रमाणे रविवारी २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कामावर हजर न झाल्याने कंपनीचे सुपरवायझर राजेश शर्मा यांनी खोलीजवळ आले असता त्यांना खोली आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. बराच वेळ आवाज दिल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजाच्या फटीतून पाहिले असतांना विनोद निमसे याने गळफास घेतल्याने दिसून आले. कंपनीच्या सुपरवायझरने फोन करून एमआयडीसी पोलीसांना सांगितले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किरण पाटील आणि किशोर बडगुजर यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यता आली आहे. पुढील तपास पोकॉ किरण पाटील आणि किशोर बडगुजर हे करीत आहे.

Protected Content