राज्यातील मोठी बातमी : अखेर धनुष्यबाण शिंदे गटाला; ठाकरे गटाला मोठा धक्का

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पक्ष चिन्हावरून गेल्या दिवसांपासून प्रलंबित असलेला न्यायालयीन निर्णयावर आज सुनावणी झाली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. हा निर्णयामुळे उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर झाले. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार धनुष्यबान आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याने राजकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे.

Protected Content