नेरी नाका वर्क शॉप समोरून एकाची दुचाकी लांबविली

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एसटी वर्क शॉप परिसरात लग्नात आलेल्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वृषभ राजाभाऊ माहुरकर (वय-२६) रा. गेंदालाल मिल, आश्रम शाळेजवळ जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९, डीडी ८१६५) ने शहरातील नेरी नाका परिसरातील एसटी वर्कशॉपजवळ असलेल्या मीराई लॉन येथे आले. त्या ठिकाणी दुचाकी पार करून लग्नासाठी निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेले. सायकाळी ४.३० लग्न आटोपून घरी निघायच्या तयारीत असताना त्यांना जागेवर दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध करूनही कुठेही मिळू न आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!