Home क्राईम शेतातून पाईपांची चोरी करतांना दोघांना रंगेहात पकडले

शेतातून पाईपांची चोरी करतांना दोघांना रंगेहात पकडले

0
102

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील फुपनगरी शिवारातून शेतकऱ्याच्या शेतातून पाईपाची चोरी करणाऱ्या दोन जणांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोहर आनंदराव जाधव (वय-६५) रा. फुपनगरी ता. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे फुपनगरी शेत शिवारातील शेत गट क्रमांक २२ मध्ये शेती आहे. शुक्रवार २९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी  शाहरुख शहा भिकन शहा आणि आरिफ शहा सुलेमान शहा दोन्ही रा.गेंदालाल मिल, जळगाह  हे रिक्षा क्रमांक (एमएच ०३, एएच ५४३४) ने  शेतात आले. मनोहर जाधव यांच्या शेतातील ३० नग प्लास्टीक पाईप चोरून नेत असतांना आढळून आले. दोन्ही संशयित आरोपीना शेतकरी मनोहर जाधव यांनी जागेवरच पकडून जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  याप्रकरणी मनोहर जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शाहरुख शहा भिकन शहा आणि आरिफ शहा सलेमान शहा दोन्ही रा. गेंदालाल मिल यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सतिश हारनोळ करीत आहे.


Protected Content

Play sound