काश्मीरमध्ये टेलिफोन तर जम्मूमध्ये इंटरनेट सेवा सुरू

download 2

 

श्रीनगर (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये लावलेले निर्बंध हळूहळू उठविण्यास सुरुवात केली आहे. खोऱ्यातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर जम्मूमध्ये ‘२ जी’ इंटरनेट तर, काश्मीरमध्ये फोन सेवा सुरू करण्यात आली आहे.

कलम ३७० रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. काश्मीरमध्ये आज (शनिवार) पासून दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे. तर जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील दूरध्वनी आणि २जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. तब्बल १२ दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत.

जम्मू काश्मीर घाटीमध्ये सरकारी कार्यांलयातील कामकाज सुरु झाले आहे. अनेक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची चांगली उपस्थितीही आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती चिघळू नये यासाठी 5 ऑगस्ट रोजी अनेक बंदी घालण्यात आल्या होत्या. तेव्हापासून कोणतीही मोठी हिंसाचाराची घटना समोर आलेली नाही, अशी माहिती सुब्रमण्यम यांनी दिली.

Protected Content