आत्मनिर्भर घोषणेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय गोत्यात

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी भारतातील टाटा, रिलायन्स जिओ, पतंजली या मोठ्या कंपनींनी निविदा पाठवल्या होत्या. नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’मुळे या तीन पैकी एक कंपनीला आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळेल, असे म्हटले जात होते. पण तसे घडले मात्र नाही. कारण या तिन्ही कंपन्या वगळून ड्रीम इलेव्हन या कंपनीला बीसीसीआयने आयपीएलची स्पॉन्सरशिप दिली.

नरेंद्र मोदींचे ‘आत्मनिर्भर भारत’ नेमके काय सांगते
लॉकडाऊनच्या काळात नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही एक घोषणा केली होती. ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणजे भारतातील कंपन्यांना जास्त वाव देणे किंवा या कंपन्या अजून चांगल्या कशी होतील, हे पाहणे. त्यामुळे आयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी जर एखादी भारतीय कंपनी निवडली गेली असती तर ते चांगले झाले असते, असे म्हटले जात आहे.

Protected Content