शिवसेनेचा प्रस्ताव आल्याशिवाय पुढे कसे जाणार : शरद पवार

sharad pawar in jalgaon

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरकार स्थापन करण्यासंदर्भात शिवसेनेच्या नेतृत्वाशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही. शिवसेनेचा प्रस्ताव आल्याशिवाय पुढे कसे जाणार, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापन्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. आज (सोमवार) संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबर १० जनपथ निवासस्थानी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

यावेळी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार ? या प्रश्नावर पवार यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झालेली नाही. त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री बनणार या चर्चेलाही पवारांनी पूर्णविराम दिला. आपण मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवारांनी स्पष्ट केले. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना-भाजपाची आहे. तर सोनिया गांधींच्या भेटीसंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी सोनिया गांधींना माहिती देण्याचे ठरले होते, त्याप्रमाणे आज भेट घेऊन माहिती दिली. शिवसेना सातत्याने सामनातून भाजपविषयी लिहीत आहे. आम्ही चर्चा करुन पुन्हा भेटण्याचे ठरवले आहे.

Protected Content