फडणविसांच्या ऐवजी गडकरींना मुख्यमंत्री करा ; शिवसेनेची गुगली

Uddhav Nitin

 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेतृत्त्वाला भाजपचा मुख्यमंत्री करायचा झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नितीन गडकरी यांना पदावर बसवावे, असे शिवसेनेचे म्हणणे असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेने टाकलेल्या गुगलीवर भाजपकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही काल्पनिक गोष्ट असल्याचे म्हटले. परंतु, ही शक्यता नाकारतादेखील येणार नाही,असेही म्हटले आहे. त्यामुळे फडणविसांच्या ऐवजी गडकरींना मुख्यमंत्री केल्यास शिवसेना सत्तेत सामील होऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 

 

शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाचा तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या फिफ्टी-फिफ्टी वाटपासाठी आग्रही आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेने भाजपशी संवाद बंद केला होता. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, पडद्यामागे अजूनही गुप्तपणे शिवसेना आणि भाजपमध्ये संवाद सुरु आहे. यावेळी शिवसेनेकडून भाजप नेतृत्त्वापुढे दोन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यापैकी पहिल्या मागणीनुसार भाजपचा मुख्यमंत्री करायचा झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नितीन गडकरी यांना पदावर बसवावे, असे सेनेचे म्हणणे आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही काल्पनिक गोष्ट असल्याचे म्हटले. परंतु, ही शक्यता नाकारतादेखील येणार नाही,असेही म्हटले. त्यामुळे फडणविसांच्या ऐवजी गडकरींना मुख्यमंत्री केल्यास शिवसेना सत्तेत सामील होऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Protected Content