खडसेंविरोधात अपक्ष निवडणूक लढविण्याचे चंद्रकांत पाटील यांचे संकेत

398348e9 aecf 4328 90c7 3e283752ba35

 

मुक्ताईनगर  (प्रतिनिधी) भाजप-शिवसेनेत युती झाली तरी आपण पक्षाचा राजीनामा देऊन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले आहेत.

 

खडसे व पाटील यांच्यात राजकीय हाडवैर आहे. म्हणूनच 2014 मध्ये पाटील हे खडसेंविरोधात उभे होते. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाटील यांना मदत केली होती. परंतू तरी देखील पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यंदाही खडसेंविरुद्ध सर्वांनी एकत्रित सक्षम उमेदवार द्यावा, म्हणून पाटील प्रयत्नशील आहेत. 2014 मध्ये भाजप-शिवसेनेची युती तोडण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी जाहीर केला होता. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांत खडसेंविषयी प्रचंड राग आहे.

Protected Content