योगी आदित्यनाथ यांनाच पुन्हा मिळणार कौल : सर्वेक्षणाचा अंदाज

लखनऊ वृत्तसंस्था | उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पुन्हा कौल मिळणार असल्याचे ताज्या सर्वेक्षणामधून अधोरेखीत करण्यात आले आहे.

टाईम्स नाऊ आणि पोलस्ट्रेटच्या ओपिनियन पोलचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहे. यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल. भाजपला ४०३ पैकी २३९ ते २४५ जागा तर समाजवादी पक्षाला ११९ ते १२५ जागा मिळतील असा अंदाज आहे. बहुजन समाज पक्ष ३० जागांसह तिसर्‍या, तर कॉंग्रेस ५ ते ८ जागांसह चौथ्या क्रमांकावर असेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.

टाईम्स नाऊ आणि पोलस्ट्रेटनं केलेलं सर्वेक्षण खरं ठरल्यास योगी आदित्यनाथ सलग दुसर्‍यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील. याआधी उत्तर प्रदेशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांना सलग दोन टर्म मिळालेल्या नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत योगींची कामगिरी चांगली झाल्याचं जनतेला वाटतं. जबरदस्तीनं केलं जाणारं धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याचे संकेत योगींनी दिले आहेत. त्याचा परिणाम सर्वेक्षणात दिसला. यामुळे हा सर्वे खरा ठरल्यास योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार आहेत.

Protected Content