पारोळा येथील बालाजी मंदिरात भाविकांनी केले साडे चार लाखांचे दान

WhatsApp Image 2019 09 28 at 7.54.08 PM

पारोळा, प्रातिनिधी | बालाजी मंदिरातील दानपेटीतील दानाचे मोजणी दिनांक २७ रोजी करण्यात आली. गेल्या ९ महिन्यात भाविकांनी एकूण ४ लाख ४५ हजार ३७५ रुपयांचे दान दानपेटीत केले.

बालाजी मंदिरात पैशांप्रमाणे काही भाविकांनी सोने चांदीच्या वस्तू ही दान केल्यात त्यात ३ लाख ५३ हजार रुपयांच्या नोटा आणि ९२ हजार ३७५ रुपयांची चिल्लर दान पेटीत निघाली. सुमारे ५ ते ६ सहा तास ही दान पेटीतील पैशाची मोजदाद चालली. त्यात सोन्याचे ३ ग्रॅमचे वस्तू चांदीचे ४ भारचे तुकडे ,परकीय चलनातील एक युरो डॉलर असे भाविकांनी दानपेटीत दान केले होते. भाविकांनी केलेल्या या दानातून मंदिराच्या मूलभूत सोयी सुविधासाठी त्याचा पैशांचा उपयोग करून भक्तांना त्याचा लाभ मिळवून दिला जाईल असे संस्थानाचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांनी यावेळी सांगितले. दान पेटीतील दान मोजदादसाठी संस्थानाचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी , कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त डॉ. अनिल गुजराथी, प्रकाश शिंपी, संजय कासार, अरुण वाणी, दिनेश गुजराथी, केशव क्षत्रिय, समिती सदस्य चंद्रकांत शिंपी, दिलीप शिरूडकर, प्रमोद शिरोळे, राजेंद्र चौधरी, बापू कुंभार, डी. डी. वाणी, गुणवंत पाटील, बापू राजपूत, रमेश शिंपी, बापू शिंपी, दीपक शिंपी यांच्यासह बालाजी भक्त उपस्थित होते.

Protected Content