जिल्ह्यात आज २ रूग्ण पॉझिटिव्ह, तर १ रूग्ण बरा

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात २ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर १ रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

दिवसभरात जळगाव शहर येथे १ आणि भुसावळ येथे १ असे २ कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५३४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या ६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content