अट्रावल शिवारातील गोडावूनमधून हरभरा व धान्याची चोरी; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोडावून मधून हरभऱ्याचे १४ पोटे अणि २ पोते धान्य असा एकुण २४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी १४ मार्च रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, “यावल तालुक्यातील अट्रावल शिवारात किरण कडू महाजन यांचे शेत आहे. शेतात त्यांनी धान्य ठेवण्यासाठी गोडावून करण्यात आले असून त्याठिकाणी ते धान्य व शेतातील माल ठेवतात. दरम्यान १३ मार्च रोजी रात्री १० ते १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्याच्या शेतातील गोडावून मधून १४ पोटे हरभरे आणि २ पोते धान्य असे एकूण २४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले.

यावेळी गोडावूनचा पत्रा उचकावून नेल्याचे दिसून आले आहे. याबाबत शेतकरी किरण महाजन यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक जवरे करीत आहे.

Protected Content