बोदवड तालुक्यातील 10 रस्त्यांसाठी अर्थसंकल्पातून 6 कोटीचा निधी

बोदवड – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्त्यांना 6 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पार पडणार असून ग्रामीण भागातील गाव खेडे पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून एकमेकांना जुळणार आहेत.

तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग हे जिल्हा परिषदेच्या निधीवर अवलंबून होते. जिल्हा परिषदेचा निधी कमी स्वरुपात असल्याने ग्रामीण भाग हा रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणपासुन दूर होता. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गाला निधी शासन स्तरावरून उपलब्ध व्हावा याबाबत मागणी केली होती. ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्त्यांना 6 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

त्यामुळे सदरील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पार पडणार असल्याने जि.प. मदती अभावी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणा संदर्भात कामे थांबणार आता थांबणार नाहीत. ग्रामीण भागांतील गाव खेडे पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून  एकमेकांना जुळणार आहेत.

मंजूर झालेले रस्ते व निधी एकूण 10 कामे (617.5 लक्ष)

1) एनगाव ते चिखली रस्ता ग्रामीण मार्ग 16 किमी 0/00 ते 1/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 28.5 लक्ष

2) साळशिंगी ते उजनी जलचक्र रस्ता इजीमा 31 किमी 0/00 ते 4/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 66.5 लक्ष

3) करंजी ते भानखेडा रस्ता ग्रामीण मार्ग 17 किमी 0/00 ते 2/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 66.5 लक्ष

4) मानमोडी ते विचवा रस्ता ग्रामीण मार्ग 42 किमी 0/00 ते 3/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 47.5 लक्ष

5) 5) मनुर बु ते राजुर रस्ता इजीमा 32 किमी 32 किमी 0/00 ते 3/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 57.00 लक्ष

6) लोणवाडी ते पिंपळगाव देवी रस्ता इजिमा 32 किमी 0/00 ते 2/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 47.5 लक्ष

7) वराड ते सुरवाडे खुर्द ग्रामा 66 किमी 0/00 ते 3/00 मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 66.50 लक्ष

8) सोनोटी ते बोदवड रस्ता ग्रामा 15 किमी 0/00 ते 2/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 47.50 लक्ष

9) निमखेड ते घाणखेड रस्ता ग्रामा 15 किमी 0/00 ते 2/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 47.50 लक्ष

10) कोल्हाडी निमखेड रामा 270 हरणखेड चिखली मनुर खु मनुर बु  रामा46 शेलवड रामा 753  एल प्रजिमा  90 किमी 25/00 ते 29/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे. किंमत 142.50 लक्ष

Protected Content