नशिराबाद येथील २१ वर्षीय तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील २१ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून अत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजले नाही. याप्रकरणी  नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समीना बानो शेख अफसर (वय-२१) रा. नशिराबाद ता.जि. जळगाव असे मयत तरूणीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, समीना बानो ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार ३ जानेवारी रोजी तरूणीने राहत्या घरात कुणीही नसतांना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. तरूणीच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. घरातील सदस्य घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांसह शेजारच्यांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Protected Content