आमची व्यक्तीशी नाही प्रवृत्तीशी लढाई – शांताराम पाटील

WhatsApp Image 2019 10 15 at 6.06.39 PM

चोपडा, प्रतिनिधी | चोपडा तालुक्याची ओळख शांत , सुसंस्कृत तालुका म्हणून आहे. सर्व पक्षिय, सर्व जाती धर्माचा उमेदवार म्हणून प्रभाकर सोनवणे हे होय असे प्रतिपादन आज बूथ मेळाव्यात शांताराम पाटील यांनी केले. यावेळी सर्व पक्षिय नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रभाकर पाटील यांच्या बूथ मेळावा गिरीराज लॉन्स येथे घेण्यात आला होता. या मेळाव्यात उमेदवार प्रभाकर सोनवणे यांच्या वाढदिवसाचा पूर्वसंध्येला हा मेळावा घेण्यात आला आम्हाला सांगितले जाते की, युतीधर्म पाळा आणि काही दिवसांपूर्वीच खासदार रक्षा खडसे या मतदारसंघात खासदारकीसाठी उभ्या होत्या. तेव्हा आपण कुठलं युतीधर्म पाळला ? आणि खरा युतीधर्म आताही पाळत आहे. कारण चोपडा तालुक्यात खरी शिवसेना वाढविणारे कैलास पाटील हे आमच्या सोबत आहेत. ते सांगता की, विकास केला …विकासात मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ते तयार केले आहे. जिल्हा परिषदेतून रस्ते तयार केले आणि यांनी फक्त आपल्या नावाचे बोर्ड लावले. त्यामुळे आता सरकारही भाजपाचे आणि आमदारही भाजपाप्रणित असायला हवा. प्रभाकर सोनवणे हे अपक्ष उमेदवार आहेत तर तेच चांगले आहे. कारण कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी आपल्या व्यासपीठावर येऊन बसू शकतो असे मत शांताराम पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी सुत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले. याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अनेक नवयुवकांनी प्रभाकर पाटील यांच्यासोबत सेल्फी काढला. नवयुवकामध्ये उस्फुर्त प्रतिसाद दिसत होता. यावेळी यावेळी ए. डी. चौधरी, गजेंद्र सोनवणे, आत्माराम म्हाळके, चंद्रशेखर पाटील, इंदिरा पाटील, अमृतराज सचदेव, जे. टी. पाटील, गजेंद्र जैस्वाल, हिम्मतसिंग पाटील, रंजना नेवे, कल्पना जगताप, रविंद्र पाटील, कांतीलाल पाटील, हनुमंत पाटील, देवेंद्र पाटील, प्रदीप पाटील, डी. पी. साळुंखे, भारती शिरसाठ, शेख अरशाद, शेख हारून, प्रल्हाद पाटील, भुषण भिल, प्रकाश पाटील, युनूसअली कायमअलि, पंकज पाटील, जबरा तडवी, रामसिंग भिल, पिंटू पावरा, हर्षद खान, कमलेश शिंपी, मनोहर पाटील, अजय राजपूत, रमाकांत बोरसे, भिवराज रायसिंग, रोहिदास अहिरे, रामचंद्र भादले, प्रकाश पाटील आदी अनेक मान्यवरांसह कार्यकर्ते हजर होते

Protected Content