निवडणूक निरीक्षक छोटेलाल प्यासे यांची अमळनेरला भेट

WhatsApp Image 2019 04 08 at 8.25.03 AM

अमळनेर (प्रतिनिधी ) निवडणूक निरीक्षक छोटेलाल प्यासे यांनी अमळनेरला आज भेट देऊन लोकसभा निवडणूकी सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्याना विविध सूचना दिल्या, तसेच त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विविध स्वरापातील माहिती जाणून घेत स्ट्रॉंग रूम , वितरण केंद्र यांची पाहणी केली.

 

निवडणूक निरीक्षक छोटेलाल प्यासे यांनी  सहाय्यक निवडणूक अधिकारी डीवायएसपी राजेंद्र ससाणे , पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, पारोळ्याचे पोलीस निरीक्षक मारवडचे सहाययक पोलीस निरीक्षक समाधान पाटील , मंडलाधिकारी , तलाठी , बी.एल.ओ यांची बैठक घेऊन संवेदनशील केंद्र , अडचणीचे केंद्र यांची माहिती जाणून घेतली व त्यांना विशेष सूचना केल्या. त्यानंतर प्रताप महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूम , वितरण केंद्र यांची पाहणी केली.  सानेगुरुजी शाळा,  प्रताप हायस्कूल, समाज मंदिर , एन. टी. मुंदडा हायस्कूल , मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह , व पातोंडा येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार ज्योती देवरे , अभियंता एस. एस. वारुळे , स्थापत्य अभियंता श्रीकांत चिखलोदकर, नगरपरिषद वसुली अधिकारी संजय चौधरी हजर होते.

 

Add Comment

Protected Content