भाजपाचे निवडणूक ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध

bjp 1 4395074 835x547 m

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. यावेळी नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

 

भाजपाने सन २०२२ पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील ७५ संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यावर विचार करुन ‘संकल्पपत्र’ तयार करण्यात आले आहे. भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून जवळपास ७५०० सूचना पेट्या, ३०० रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे.

संकल्पपत्रातील ठळक मुद्दे …
– एक लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर पाच वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही.
– सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार.
– राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार.
– दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी.
– छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार.
– प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य.
– सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाणार.
– तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार.
– सिटीजनशिप विधेयक लागू करणार.
– सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार.

Add Comment

Protected Content