रावेरात कृउबा निवडणूकीसाठी “सर्वपक्षीय पॅनल” देण्यासाठी हालचाली गतिमान

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर कृषी उपन्न बाजार समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. बाजार समितीला सर्वपक्षीय पॅनल देण्याच्या तयारी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आहे.या संदर्भाची महत्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत सर्वपक्षीय निवड समिती तयार करण्यात आली आहे.

 

कोरोना पासुन लांबलेल्या कृषी उपन्न बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच लागल्या आहे. या पार्श्वभूमीवर रावेर पिपल्स बँकमध्ये माजी आ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला रावेर तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते सर्वपक्षीय पॅनल देण्यावर एकमत झाले व यासाठी सर्वपक्षीय निवड समिती करण्यात आली. या बैठकीला कॉग्रेसचे राजीव पाटील भाजपा उत्तर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेना  योगिराज पाटील, छोटू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, ज्ञानेश्वर महाजन, महेश चौधरी, निळकंठ चौधरी, सिताराम पाटील, नितिन पाटील, यशंवत धनके आदी उपस्थित होते. बाजार समितीच्या मागील सर्वपक्षीय संचालक मंडळामध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्यांची यावेळेस पत्ते कापली जाणार असल्याची दाट शक्यता आहे.

 

बैठकीत उमेदवार निवड समिती केली तयार

सर्वपक्षीय निवड समितीमध्ये आ  शिरीष चौधरी माजी आ अरुण पाटील भाजपाचे सुरेश धनके  नंदकिशोर महाजन कॉग्रेसचे राजीव पाटील यांच्यासह सर्व पक्षाचे तालुकाध्यक्ष घेण्यात आले असून यांना आप-आपल्या पक्षातुन ठरल्या प्रमाणे उमेदवारा द्यायची आहे.या समितीची पुढची बैठक २७ मार्चला होणार आहे.

Protected Content