ईश्वर पाटील यांची लखनऊ येथे भारतेंदू नाट्य अकादमीत निवड

जळगाव प्रतिनिधी । लखनऊ येथील भारतेंदू नाट्य अकादमीसाठी संपूर्ण भारतातून विद्यार्थ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. यात २५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून जळगाव शहरातील कुसुंबा येथे राहणाऱ्या ईश्वर पाटील यांची देखील निवड झाली आहे. ईश्वर यांना वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

भारतेंदू नाट्य अकादमी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नाट्य प्रशिक्षण संस्था आहे जिथून नवाजुद्दीन सिद्दीकी, राजपाल यादव या सारखे खूप मोठ मोठे कलावंत बाहेर पडले आहेत आणि इथे प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतातून फक्त वीस विद्यार्थ्यांची निवड केली जाते  त्यात महाराष्ट्रातून ईश्वर पाटील या एकमेव विद्यार्थ्याची निवड झाली आहे. ईश्वर हा जळगांव जिल्ह्यातील कुसुम्बा या गावाचा रहिवासी आहे त्याने नूतन मराठा महाविद्यालय इथून आपले बी.कॉम चे शिक्षण पूर्ण केले आहे तसेच एस. एस.मणियार लॉ कॉलेज मधून एल. एल.बी चे शिक्षण प्राप्त केले आहे नाट्यक्षेत्रात प्रशांत दामले संचलित टी-स्कुल पुणे इथून अभिनयाचे शिक्षण घेतले असून २०१४ पासून नाट्य क्षेत्रात काम करत आहे ईश्वर यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.

 

Protected Content