म्हसावद येथे पोळानिमित्त “बैलजोडी सौदर्य स्पर्धा”

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी पोळा सणाच्या निमित्त बैलजोडी सौदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या स्पर्धेमध्ये विजेत्या बैलजोडी मालकाला बक्षिस देण्यात आले. जळगाव जिल्ह्यात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही सण साजरे करण्यास निर्बंध लावण्यात आले होते. आता कोरोना आटोक्यात आल्याने बळीराजाचा सण अर्थात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे पोळा निमित्त बैलजोडी सौदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बैलजोडीची उत्कृष्ट सजावट केलेल्या पहिल्या तीन विजेते शेतकऱ्यांना बक्षिस देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांकात बिसा पटेल, दुसऱ्या क्रमांकावर भिका पाटील आणि तृतीय क्रमांकावर आनंद भामरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रशिक्षक अशोक पोरवाल, अशोक पोरवाल, सुरेश चिंचोरे, राजेंद्र महाजन, विजय पाटील,, दीपक चिंचोरे, किशोर चिंचोरे, मनोहर आप्पा, ईश्ववर चिंचोरे, दगडू पाटील, डॉ. राजू चिंचोरे यांच्यासह गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content