पिगी बँकेत जमा केलेल्या पैशातून दिपावलीनिमित्त फराळ वाटप

एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील खडके बु. येथील कै. यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित अनाथ, निराधार,निराश्रित मुलांचे व मुलींचे बालगृह या संस्थेत शेंदुर्णी येथील उपप्राचार्य डॉ.शाम साळुंखे यांची कन्या आयुषीने तिचा वाढदिवस संस्थेत तिने पिगी बँकेत जमा केलेल्या पैशातून दिपावलीनिमित्त फराळ वाटप साजरा केला.

 

अनाथ, निराधार,निराश्रित बालकांप्रती अस्था असल्याने नुकतेच राष्ट्रीय कला गौरव आणि राष्ट्रीय कलारंग हे दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार एकाच वेळी मिळवणारी आयुषीने स्वतःला मिळणा-या पैशांच्या स्वबचतीतून जमा पैशातून ३०००/-रूपये बचत करुन मुलामुलींसाठी दिपावळी निमित्त शंकरपाळे, बर्फी,शेव चिवडा,नमकिन आदी वस्तू वाटप केल्या. यावेळी डॉ. साळुंखे सर, प्रिती साळुंखे उपस्थित होते. संस्था चालक भुषण पाटील यांनी आयुषीला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष कौतुक केले.अधिक्षक मधुकर कपाटे यांनी आभार मानले.फराळ वाटपासाठी प्रमोद पाटील गणेश पंडीत ॠषीकेश ठाकरे उपस्थित होते.

Protected Content