मासुमवाडी येथे घरफोडी करणाऱ्या संशयिताला अटक; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मासुमवाडी परिसरातील सय्यद असरार नगर येथे मध्यरात्री घरातून दोन मोबाईलसह रोकड असा एकुण ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

वसीम कबीर पटले (वय-२२) रा. नशेमन कॉलनी, मास्टर कॉलनी जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शेख सलीम शेख रशिद (वय ४७) हे ब्रोकर आहेत. सोमवार, १ नोव्हेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे शेख सलीम व त्यांचे कुटुंब झोपले. मध्यरात्री चोरट्यांनी मुख्य दरवाजाची आतून लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील २ मोबाईल, २५ हजार रुपये रोख, २३ हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या १२ अंगठ्या, ८ ग्रॅमचे चांदीचे पेंडल व ३ तीन लहान पितळी भांडे असा ५५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुामरास शेख सलीम शेख रशीद हे उठले असता, दरवाडा उघडा तर घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. चोरीची खात्री झाल्यावर शेख सलीम यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात  आला होतो.

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, पोना योगेश बारी, पोकॉ सचिन पाटील, गोविंदा पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी वसीम कबीर पटेल (वय-२२) रा. नशेमन कॉलनी याला अटक केली आहे. त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून ५५ हजार पैकी ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Protected Content