रौप्यपदक विजेते पै. राजेंद्र भोई यांचा मानपत्र देऊन गौरव

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील लोहारा येथील पै. राजेंद्र भोई यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकविल्याने त्यांचा मिरगल मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

 

पै. राजेंद्र भोई यांच्या दिल्लीवरील कामगिरीची दखल मिरगल मच्छीमार सहकारी सोसायटीच्या माध्यमातून घेण्यात आली. मिरगल मच्छीमार सहकारी संस्थेने पैलवान राजेंद्र भोई यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन दशरथ भिल, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर कोळी, सचिव मोहन भोई, तसेच मच्छीमार सोसायटीचे सदस्य भगवान भोई, सुरेश भिल, पुनाजी भिल, भास्कर भोई, आत्माराम कोळी, देवराम भोई, ईश्वर भोई, संजय कोळी, अतुल कोळी आदी उपस्थित होते. यावेळी भविष्यातील कार्यासाठी पैलवान राजेंद्र भोई यांना सर्व पदाधिकारी व समाज बांधव यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Protected Content