मतदार याद्यावरील हरकती ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदविता येणार

एरंडोल प्रतिनिधी ।  आज (दि. ३ नोव्हेंबर) रोजी १६ एरंडोल मतदार संघात असणाऱ्या एरंडोल तालुक्यात १३७, पारोळा तालुक्यातील १२३ व भडगाव तालुक्यात ३० अशा एकुण २९० मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO) यांचे मार्फत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. दरम्यान, या मतदार याद्यांसंदर्भात १ ते ३० नोव्हेंबर कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जाणार आहेत.

तसेच नवीन मतदार नोंदणीबाबत विशेष मोहिमेचा कालावधी दि.13 व 14 आणि 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी असणार आहे . तद्नंतर दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी हा दि . 20 डिसेंबर 2021 पर्यंत ठेवण्यात आला असुन दि. 05 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तरी, सदर कार्यक्रमाची माहिती ग्रामीण भागात ग्रामसेभेचे आयोजन करून त्यात मतदार याद्यांचे वाचन करुन एकाच व्यक्तीचे दोनदा आलेले नाव मृत व्यक्ती, गाव सोडून गेलेली व्यक्ती किंवा अन्य मतदारयादीत नाव असलेली सर्व नावे यावेळी ग्रामसेवक यांनी पुरावे घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने कमी करावयाची आहेत. त्यामुळे या बाबत तमाम जनतेने दखल घेऊन सहकार्य करण्याचे अवाहन 16 एरंडोल संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल विनय गोसावी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल सुचिता चव्हाण यांनी केले आहे.

Protected Content