राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नेहरू युवा केंद्रतर्फे युवा संवाद अभियान संपन्न

जळगाव, प्रतिनिधी | भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र जळगावच्या वतीने स्वामी विवेकानंद जंयती व राजमाता जिजाऊच्या जन्मोत्सवा निमित्ताने ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व खुले नाट्य गृह येथे करण्यात आले होते.

 

‘युवा संवाद’ कार्यक्रमाचा शुभारंभ जेष्ठ रगंकर्मी रमेश भोळे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आले. कोविडच्या या महामारीच्या काळात आनेक संकटाचा सामना करत सांस्कृतिक क्षेत्रातील नाट्य, नृत्य संगित क्षेत्रातील युवा कलावंत आपली कला जतन व संवर्धन करण्याच कार्य अविरत पणे करत आहे… देशाचे ऐक्य व सार्वभौमत्व जर टिकवायचे असेल तर आपली कला जिवंत ठेवणे गरजेचे आहे आणि हे कार्य प्रत्येक युवा कलावंताने करायला हवे असे विचार जेष्ट रगंकर्मी रमेश भोळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव लवंगळे, रंगकर्मी तेजस गायकवाड, अमोल ठाकुर प्रदिप भोई, कल्पेशनन्नवरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केन्द्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेन्द्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका समन्वयक कोमल महाजन यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत सचिन महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यस्ववीतेसाठी दुर्गेश अंबेकर, सुदर्शन पाटील, मोहीत पाटील, अरविंद पाटील यांनी कामकाज पहिले.

Protected Content