राज्यस्तरीय शालेय फिल्ड आर्चरी स्पर्धेत सृष्टी कोल्हे सुवर्णपदकाची मानकरी

dhanaji clg 1

 

फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कनिष्ठ विभागातील इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी सृष्टी कोल्हे हिने नुकत्याच इस्लामपूर जिल्हा सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय फिल्ड आर्चरी क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मान मिळवला.

दि.15 ते 16 डिसेंबर या कालावधी दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. यात विभागाचे प्रतिनिधित्व सृष्टी कोल्हे हिने अंडर 19 रिकर्व गर्ल्स स्पर्धेत नाशिक विभागीय टीमसाठी सुवर्णपदकाची कमाई केली. यासोबतच तिने 5 स्पॉट मध्ये कांस्यपदक ही पटकावले. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील ओव्हर ऑल रँकिंगमध्ये तिने पाचवा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल जळगाव जिल्हा आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा वंदना बोरोले, प्रा.दिलीप बोदडे यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल रावेर आणि यावल तालुक्यात राज्यस्तरीय पदकाचा मान मिळविल्याबद्दल सर्वच स्तरातून सृष्टी कोल्हे हिचे कौतुक होत आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.आय.भंगाळे, जिमखाना समिती अध्यक्ष प्रा.डॉ.सतीश चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.वंदना बोरोले, प्रा.तिलोत्तमा चौधरी, प्रा.दिलीप बोदडे, प्रा.कविता भारुडे, प्रा.अर्चना वराडे यासोबत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.

Protected Content